S M L

बिग बॉस महिला असेल तरच येणार, तृप्ती देसाईंची अट

Sachin Salve | Updated On: Sep 12, 2016 08:00 PM IST

बिग बॉस महिला असेल तरच येणार, तृप्ती देसाईंची अट

12 सप्टेंबर : महिलांना मंदिरात प्रवेशासाठी लढा देणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांना 'बिग बॉस'ने निमंत्रण पाठवले आहे. पण तृप्ती देसाई यांनी बिग बॉसला वेगळीच अट घातली आहे. ती म्हणजे बिग बॉस ही महिला असावी तर आपण येऊ अशी अटच देसाई यांनी घातली आहे.

शनी मंदिराच्या चौथर्‍यावर प्रवेशासाठी एल्गार पुकारणार्‍या तृप्ती देसाई आक्रमक आंदोलनामुळे प्रकाशझोतात आल्या. शनी चौथर्‍यावर प्रवेशासाठी मोठ्या आंदोलनानंतर अखेरीस त्यांनी शनी मंदिराच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेऊनच दाखवलेच. त्यानंतर महालक्ष्मी मंदिराचा गाभारापासून ते हाजी अली दर्ग्यापर्यंत तृप्ती देसाई यांनी महिलांना प्रवेश देण्यासाठी लढा दिला.

त्यांच्या या धाडसी आंदोलनाची कलर्स वाहिनीवर लोकप्रिय बिग बॉस रिऍलिटी शोने दखल घेतली. तृप्ती देसाई यांना बिग बॉसच्या आगामी सिझनमध्ये घरात येण्याचं निमंत्रण धाडलं. पण, पण तृप्तींनी एक अजब अट घातली.

काय तर म्हणे बिग बॉसमध्ये जो पुरुषाचा आवाज येतो, म्हणजे बिग बॉसचा आवाज.. तो महिलेचाच हवा, तरच मी यात सहभागी होईन अशी अट तृप्ती देसाईंनी घातली. आजपर्यंत बिग बॉसच्या भारदस्त आवाजाने सर्व सिझन गाजवले. त्यामुळे तृप्ती देसाईंच्या अटीप्रमाणे यंदा खरंच महिला बिग बॉसचा आवाज ऐकण्यास मिळेल की तृप्ती देसाईंना प्रवेश टळणार हे पाहण्याचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2016 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close