S M L

विदर्भवादी नेत्यांच्या पत्रकार परिषदेत मनसेचा राडा

Sachin Salve | Updated On: Sep 13, 2016 10:07 PM IST

विदर्भवादी नेत्यांच्या पत्रकार परिषदेत मनसेचा राडा

मुंबई, 13 सप्टेंबर : वेगळ्या विदर्भाचा मुद्दा महाराष्ट्रात मांडू देणार नाही ,असे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांनी विदर्भवादी नेते वामनराव चटप यांची पत्रकार परिषद उधळली.

मुंबई मराठी पत्रकार संघात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, गटनेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांनी पत्रकार परिषदेवर हल्लाबोल केला. मनसेचे झेंडे घेऊन अखंड महाराष्ट्राची घोषणाबाजी करत पत्रकार परिषद बंद पाडली.

मुंबईत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडू देणार नाही, अखंड महाराष्ट्र ही मनसेची भूमिका आहे असं अमेय खोपकर यांनी म्हटलंय. तर निदान विदर्भावादी नेत्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्या, मग तुमची भूमिका मांडा असं प्रतिआव्हान विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना केलं. पण, अखंड महाराष्ट्रासाठी याहीपेक्षा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करू अशा इशारा खोपकर यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2016 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close