S M L

सातार्‍यात उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चा ?

Sachin Salve | Updated On: Sep 13, 2016 06:03 PM IST

Udayan raje bhosll213सातारा, 13 सप्टेंबर : येत्या 3 ऑक्टोबरला सातार्‍यात मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या मराठा समाजातल्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय झाला. या मोर्चाचं नेतृत्व कोणताही राजकीय नेता करणार नाही असा निर्णय झाला असला तरी खासदार उदयनराजे भोसले या मोर्चात अग्रभागी असतील असं सांगण्यात येतंय.

सातार्‍यातील मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने मराठा समाजाची मोठी बैठक नुकतीच पार पडली. जिल्ह्यातील विविध मराठा संघटना विविध नेते मंडळींनी या बैठकीला हजेरी लावली. हजारोच्या संख्येने अनेक संघटनांचे पदाधिकारी ,नागरिक या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत मराठा क्रांतीचा सातार्‍यातील मोर्चा 3 ऑक्टोबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आलं. या बैठकीचं नेतृत्व कोणताही राजकीय नेता करणार नसल्याचे सांगितलं जात होतं. मात्र तरीही या मोर्चाचे नेतृत्व सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले हे करतील असंच एकंदरीत चित्र आहे.

काही दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांनी ऍट्रॉसिटी कायद्याखाली दाखल होत असलेल्या 90 टक्के तक्रारी खोट्या असल्याचा दावा केला होता. त्यासोबतच हा कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चासाठी सातार्‍यातील राजे घराणं एकवटणार का असा प्रश्न निर्माण झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2016 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close