S M L

कपिलच्या आरोपाचं काय ?, अरबाजकडून कपिलची पाठराखण

Sachin Salve | Updated On: Sep 14, 2016 04:41 PM IST

कपिलच्या आरोपाचं काय ?, अरबाजकडून कपिलची पाठराखण

14 सप्टेंबर : कपिल शर्माने मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी अभिनेता अरबाज खाननं कपिलची बाजू घेतलीय. कपिलने जे काही आरोप केले होते त्याचं काय झालं ? असा सवालच अरबाजने विचारलाय.

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माने ऑफिस सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍याने पाच लाखांची लाच मागितली होती असा खळबळजनक आरोप केला होता. विशेष म्हणजे कपिलने याबद्दल ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हेच का अच्छे दिन ? असा सवाल केला होता. कपिलच्या आरोपामुळे भाजप आणि मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती.

एवढंच नाहीतर पालिकेनंही बेकायदेशीर बांधकामाचा ठपका ठेवत त्याच्याविरोधात एफआयर नोंदवला. अखेरीस कपिलने आपल्या ट्विटमुळे उठलेल्या वादळामुळे नरमाईची भूमिका घेत माघार घेतली.

एकटा पडलेल्या कपिलची अरबाज खानने पाठराखण केली. कपिलच्या आरोपामुळे गोंधळ झाला तो झाला. पण कपिलच्या मूळ मुद्द्याकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही, असा सवाल अरबाजनं केलाय. त्याच्या ट्विटमागचा मूळ हेतूच त्यामुळे बाजूला झाल्याचं मत अरबाज खानने व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2016 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close