S M L

मुख्यमंत्री मराठा मोर्चात फूट पाडताय, विखे पाटलांचा आरोप

Sachin Salve | Updated On: Sep 14, 2016 10:50 PM IST

vikhe on cmसंगमनेर, 14 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेत्यांसोबत बैठक घेऊन मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. विखे पाटील यांनी मराठ्यांच्या मूक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला असून येत्या 23 तारखेला होणार्‍या नगरच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. मराठा नेते मोर्चाबाबत काहीही म्हणत नाही असा सवाल आयबीएन लोकमतनं उपस्थित केला होता. त्यानंतर विखे पाटील यांनी स्वतःहून पुढे येत मोर्चात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलंय.

येत्या 23 मार्च रोजी अहमदनगरच्या मराठा मोर्चात आपण स्वतः सहभागी होणार असल्याच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. समाजाची मागणी योग्य असून आपला पाठिंबा या आंदोलनाला असल्याचं विखे पाटील यांनी जाहीर केलंय.मुख्यमंत्री समाजातील काही लोकांची बैठक घेऊन आंदोलनात फूट पाडण्याचं राजकारण करत असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केलाय. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य योग्य असून अन्य समाजाला पुढे करून काही मंडळींचा राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक त्यांच्या निवासस्थानी करणे योग्य असून बाळासाहेबांच्या आठवणींची जपवणूक मातोश्रीत करावी अशी मागणीही राधाकृष्ण विखेंनी केलीय. आत्तापर्यंत महापुरुषांच्या निवासस्थानीच स्मारक उभारले गेलेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक मातोश्रीत उभारण्याचा सल्ला विखे पाटलांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2016 06:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close