S M L

...तर अॅट्रॉसिटीची गरज नाही,आठवलेंचा मराठा मोर्चेकरांना सल्ला

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2016 12:04 AM IST

...तर अॅट्रॉसिटीची गरज नाही,आठवलेंचा मराठा मोर्चेकरांना सल्ला

14 सप्टेंबर : सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेले नेतेच मराठा समाजाला भडकावत असून,मराठा समाजाने दलितांवरचे अत्याचार थांबवावे म्हणजे ऍट्रॉसिटीची गरज भासणार नाही असा सल्ला केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवलेंनी मराठा समाजाला दिलाय.

राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहे. ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी मराठा समाजाने केली आहे. यावर दलितांनी मराठ्यांच्या मोर्च्यांना उत्तर देण्यासाठी प्रतिमोर्चे काढू नयेत असं आवाहन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. दलित आणि मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचे संघाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला होता.

या निमित्ताने रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. प्रकाश आंबेडकर काहीही बोलले तरी मोर्चे निघणारच असं आठवले यांनी स्पष्ट केलंय. शिवाय दलितांना संघ भडकावत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप सुद्धा आठवलेंनी फेटाळलाय. याआधीही रामदास आठवले यांनी कितीही मोर्चे निघाले तरी अॅट्राॅसिटी कायदा रद्द होणार नाही अशी ठाम भूमिका मांडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2016 10:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close