S M L

कपूर बंधूंची अरेरावी, पत्रकारांना धक्काबुक्की

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2016 09:57 PM IST

कपूर बंधूंची अरेरावी, पत्रकारांना धक्काबुक्की

15 सप्टेंबर : बॉलिवूडमधील प्रतिष्ठीत घराणं म्हणून कपूर घराण्याची ओळख आहे. मात्र या कपूर बंधूंचा वेगळाच चेहरा विसर्जन मिरवणुकीत पाहण्यास मिळाला. कपूर बंधूंनी पत्रकार आणि कॅमेर्‍यामॅनला धक्काबुक्की केली.

चेंबुरच्या राज कपूर स्टुडिओत दरवर्षी गणपतीची स्थापना केली जाते. याही वर्षी गणपतीची स्थापना करण्यात आली होती. आज या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि रणवीर कपूर आले होते. ढोल ताश्याच्या निनादात या गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली दादर चौपाटीवर जेव्हा ही मिरवणूक पोहोचली त्यावेळी ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना धक्काबुक्की केली.यातून माध्यमांचे प्रतिनिधीही सुटले नाहीत. कपूर बंधूंची शुटिंग करणार्‍या कॅमेरामन आणि प्रतिनिधींनाही धक्काबुक्की केली. एरवी ऋषी कपूर या ना त्या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया देण्यात पुढे असता आता मात्र त्यांनी रस्त्यावर लोकांशी आणि पत्रकारांशी धक्काबुक्की केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2016 09:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close