S M L

विष्णू सावरांच्या मतदारसंघात कुपोषणाचा आणखी एक बळी

Sachin Salve | Updated On: Sep 16, 2016 04:25 PM IST

विष्णू सावरांच्या मतदारसंघात कुपोषणाचा आणखी एक बळी

16 सप्टेंबर : 600 मुलं मेली तर असू दे की असं म्हणणार्‍या आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या मतदारसंघात कुपोषणाचा आणखी एक बळी गेलाय. पालघरच्या पेठ रांजणीत एका चिमुरडीचा कुपोषणाने मृत्यू झालाय. 2 महिन्यातला मोखाड्यातला कुपोषणाचा हा 18 वा बळी आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये कुपोषणामुळे होणार्‍या बळींची संख्या वाढल्यामुळे अनेक आदिवासी बालकांना आपला जीव गमवावा लागलाय. पालघर जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नात आता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी जातीनं लक्ष घातलंय. जव्हार, मोखाडा या भागातील बालकांना कुपोषणाच्या समस्येतून सोडविण्यासाठी आरोग्य, महिला आणि बालकल्याण आणि आदिवासी विकास या तिन्ही विभागांच्या समन्वयातून वॉर फुटिंगवर प्रयत्न करावेत, असे निर्देशच राज्यपालांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 16, 2016 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close