S M L

गृहमंत्र्यांच्याच नागपुरात पोलिसावर हेल्मेटने हल्ला

Sachin Salve | Updated On: Sep 17, 2016 11:48 AM IST

गृहमंत्र्यांच्याच नागपुरात पोलिसावर हेल्मेटने हल्ला

nagpur_police317 सप्टेंबर : राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना काही थांबण्याच नाव घेत नाहीये. राज्याची उपराजधानी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात ट्रॅफिक हेड कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. मध्यधुंद एका व्यक्तीने बारंगे यांच्यावर हेल्मेटने हल्ला चढवला. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

प्रकाश बारंगे यांनी ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई केल्यामुळे मद्यधुंद सुर्यकांत व्यास याने बारंगे यांच्यावर हेल्मेटने हल्ला केला. सुर्यकांत व्यासचंलायसन्स बारंगे यांच्याकडे मिळालं आहे. व्यास यानेच हा हल्ला केल्याच बारंगे यांनी सांगितलं आहे. व्यास याने हेल्मेटने बारंगे यांच्यावर हल्ला केला त्यात त्यांच्या डोक्याला जबर जखमी झाली आहे. बारंगे यांना नागपुरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2016 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close