S M L

पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Sep 17, 2016 01:15 PM IST

 पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून आत्महत्या

17 सप्टेंबर : जालना जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पठाडे यांनी मध्यरात्री 12.30 वाजता सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. ते 30 वर्षांचे होते. या आत्महत्येमागचं कारण अद्याही समजू शकलेलं नाही.

जालना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पठाडे यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात सर्विस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. मध्यरात्री दरम्यानची घटना आहे. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत होते.

स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडून घेत त्यांनी जीवन संपवलं. प्रभाकर पठाडे हे मूळचे औरंगाबाद तालुक्यातील वरझडी गावचे रहिवासी होते. 2006 पासून ते पोलीस सेवेत कार्यरत होते. 2014 साली पीएसआय पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची औरंगाबादमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झाली होती.

तत्कालिन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पठाडे यांची नेमणूक जालना जिल्ह्यात केली. मात्र काल रात्री त्यांनी अचानक डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांच्या जाण्याने एक कर्तव्यदक्ष पोलीस गमावल्याची भावना त्यांच्या सहकार्‍यांनी व्यक्त केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2016 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close