S M L

लग्नाच्या वेळी आम्ही कडूतले नाही, लय वरचा दर्जाचे -अजित पवार

Sachin Salve | Updated On: Sep 17, 2016 08:35 PM IST

लग्नाच्या वेळी आम्ही कडूतले नाही, लय वरचा दर्जाचे -अजित पवार

बारामती, 17 सप्टेंबर : माझ्या सह सगळ्यांना मराठा आरक्षण पाहिजे. आणि दुसरीकडे मराठा म्हणून मिरवायलाही पाहिजे. लग्न समारंभात या गोष्टी आल्या की आरक्षण बाजूला ठेवून आम्ही कसे वरच्या जातीतले हे सांगायला विसरत नाहीत असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. ते बारामतीत बोलत होते.

बारामती पंचायतसमितीच्या वतीने कविवर्य मोरोपंत सभागृहात तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा गुणगौरव समारंभात आयोजित करण्यात आला होता. जिल्हापरिषद शाळेतील खुल्या गटातील विद्यार्थीना मोफत गणवेशापासून वंचित राहत आसल्याची बाब काहीनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर पवारांनी आरक्षणाच्या मुद्यावर खोचक टोला लगावला.

पवार म्हणाले," माझ्या सहीत सगळ्यांना आरक्षण पाहिजे, दुसरीकडे मिरवायलाही पाहिजे. लग्नसमारंभ या गोष्टी आल्या की मग हे सगळे आरक्षण बाजूला ठेवून आम्ही कडूतले नाही, आम्ही वरच्या दर्जाचे, लय लय वरचे असे सांगायलाही ते विसरत नाहीत. असं सांगत पवार पुढे म्हणाले, मी या बाबत खूप ऐकलंय पण आता मला सर्वांची गरज आसल्याने मी जास्त बोलत नाही. मागे काय काय बोलून माझे लय वंगाळ काम झालंय. असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2016 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close