S M L

कपिल शर्माच्या अडचणीत अवैध बांधकामाचा 'भर' !

Sachin Salve | Updated On: Sep 17, 2016 08:29 PM IST

kapil_sharma17 सप्टेंबर : कॉमोडियन कपील शर्माच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बांधकाम करतांना तिवरांची कत्तल केल्या असल्याचा वनविभागाने अहवाल दिला. उपनगर जिल्हाधिकार्‍यांकडे हा अहवाल सादर केला. बांधकामासाठी अवैध पद्धतीने मातीचा भराव टाकला असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.

कपिल शर्माने मुंबई महापालिका अधिकार्‍यांनी लाच मागितल्याचा आरोप ट्विटरद्वारे केला. त्यानंतर सगळीकडे चर्चेला उधाण आले. पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत चौकशी केली.  कपिल शर्मा यांनी मुंबई महापालिकेला पाच लाखांची लाच देण्याची वेळ आल्याचे "ट्विटट मात्र, कपिलचे बांधकामच अवैध केल्याचे उघड झाले. पालिकेनं याबद्दल नोटीसही बजावली होती. तसंच वनविभागाने चौकशी केली असता कपिलने आपल्या ऑफिसच्या बांधकामासाठी तिवरांची कत्तल केल्याचं समोर आलंय. वनविभागाने आपला अहवाल सादर केला असून या अहवालाअंतर्गत आता कपिलवर कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2016 08:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close