S M L

90वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत?

Samruddha Bhambure | Updated On: Sep 18, 2016 06:42 PM IST

90वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत?

18 सप्टेंबर : आगामी 90वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत घेण्याचा निर्णय रविवारी पुण्यात झालेल्या महामंडळाच्या बैठकीत आला असून, अधिकृत घोषणा येत्या 20 तारखेला नागपूरमध्ये होणार आहे.

संमेलनस्थळाकरिता बेळगाव, कल्याण, सातारा, इंदापूर, चंद्रपूर आणि रिद्धपूर येथून निमंत्रणे आली होती. डोंबिवलीतील सांस्कृतिक वातावरण चांगलं आहे. त्यामुळे डोंबिवलीचं नाव आघाडीवर होते. या पार्श्वभूमीवर अखेर डोंबिवलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा येत्या 20 तारखेला नागपुरात होणार्‍या महामंडळाच्या बैठकीत करण्यात येणार आहे.

दरम्यान, तसंच संमेलनाची अध्यक्षपद कोणाच्या गळ्यात पडेल याचीदेखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2016 06:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close