S M L

महाराष्ट्राने सावधगिरी बाळगावी

19 एप्रिलबंगळुरूमध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने अधिक सावधगिरी बाळगावी, असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शनिवारी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामुळे तेथील आयपीएलच्या सेमिफायनलच्या दोन्ही मॅच नवी मुंबईत हलवण्यात आल्यात. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर या मॅच खेळवण्याचा निर्णय बीबीसीआयने घेतला आहे. या मॅचमध्येही अडथळा आणण्याचा प्रयत्न अतिरेक्यांकडून होऊ शकतो, असा इशारा गृहमंत्रालयाने दिला आहे. नवी मुंबईतील आयपीएलच्या सामन्यांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था केल्याचे अनामी रॉय यांनी सांगितले. आज त्यांनी डी. वाय. पाटील स्टेडियमची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2010 11:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2010 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close