S M L

अमेरिकेसारखी हिंमत दाखवणार नसाल तर तुमचा काय फायदा ? - सामना

Samruddha Bhambure | Updated On: Sep 19, 2016 02:08 PM IST

uddhav_thackery_dasara_melava_2015

19 सप्टेंबर : जम्मू काश्मीरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला संपवले होते. तशी हिंमत दाखवणार नसाल तर मोदीजी तुमच्या आंतरराष्ट्रीय स्थानाचा देशाला फायदा काय असा थेट सवाल शिवसेनेने विचारला आहे. तसंच, पाकिस्तानी कारस्थानाचे पुरावे शोधण्यापेक्षा ठोस लष्करी कारवाई करुन पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

पठाणकोटच्या हवाई तळावर झालेल्या हल्ल्यापेक्षा उरी हल्ला मोठा असून हिंदुस्थानच्या संरक्षण सज्जतेची ही बेअब्रू आहे, असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून आपल्याच सरकारवर तोफ डागली आहे.

रशियाचे पुतिन आणि अमेरिकेचे ओबामा पंतप्रधानांचे मित्र असतीलही, पण त्यांना आलिंगने देऊन पाकिस्तानची बोबडी वळत नाही. उलट त्यांच्यातील सैतान जास्तच चवताळतो आहे. म्हणूनच अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारण्याचे धैर्य दाखवले तशी हिंमत मोदी सरकार दाखवणार नसेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील तुमच्या स्थानाचा आम्हाला फायदा नाही, असा सणसणीत टोला उद्धव यांनी मोदींना लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2016 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close