S M L

जालन्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा; दानवे, लोणीकरही मोर्च्यात सहभागी

Sachin Salve | Updated On: Sep 19, 2016 07:21 PM IST

जालन्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा; दानवे, लोणीकरही मोर्च्यात सहभागी

19 सप्टेंबर : जालन्यातही मराठा क्रांती मोर्चा निघाला होता .विशेष म्हणजे इथंही राजकीय नेत्यांची मांदियाळी या मोर्चात दिसली.भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर सहभागी झाले होते.

सकाळपासूनचं या मोर्चात सहभागी होण्यासाठी महिला पुरुष युवक युवती अबाल वृद्ध जालना शहराकडे वाहनातून येण्यास सुरुवात झाली होती. शिवाजी पुतळा इथून मोर्चाला सुरुवात झाली तेव्हा अंबड चौफुली पर्यंत मोर्चेकरी शहरातील प्रमुख आणि शहराबाहेरील मार्गावरून पोहोचत होते.

कोपर्डीच्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ऍट्रोसिटी कायदा रद्द करावा अशा मागण्या मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्यात.या मोर्चामध्ये तब्बल 7 ते 8 लाख मोर्चेकरी सहभागी झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला, तरी या मोर्चात 4 ते 5 लाखाची गर्दी होती अस जाणकार सांगतात. विशेष म्हणजे या मोर्चात पहिल्यांदाच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2016 07:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close