S M L

शहीद चंद्रकांत गलंडेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Sachin Salve | Updated On: Sep 20, 2016 12:28 PM IST

शहीद चंद्रकांत गलंडेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

20 सप्टेंबर : उरी हल्ल्यात शहीद झालेले जवान चंद्रशेखथर गलंडे यांच्या पार्थिवावर सकाळी साडे दहाच्या सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करी इतमामात गलंडे यांना अखरेचा निरोप देण्यात आला.  यावेळी हजारो गावकरी आपल्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते.

 

रविवारी काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील चार जवानाचा समावेश आहे. सोमवारी संध्याकाळी चारही जवानाचे पार्थिव नाशिकच्या ओझर विमानतळावर आणण्यात आले. तिथून जवानांच्या मुळगावी रवाना झाले. साताऱ्याचे शहीद जवान चंद्रशेखऱ गलंडे यांचं पार्थिव सकाळी मुळगावी रवाना झालं. त्यांचं पार्थिव गावी पोहोचल्यावर आपल्या सुपुत्राचे पार्थिव पाहुन नातेवाईक आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. चंद्रशेखर गलंडे अमर रहे अशा घोषणा देत गावकऱ्यांनी आपल्या सुपुत्राला साश्रू नयनाने निरोप दिला. यावेळी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, गिरीश बापट आणि  विजय शिवतारे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2016 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close