S M L

सोमय्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं गिरगाव चौपाटीवर 'स्वच्छता अभियान'

Sachin Salve | Updated On: Sep 20, 2016 03:03 PM IST

 सोमय्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं गिरगाव चौपाटीवर 'स्वच्छता अभियान'

मुंबई, 20 सप्टेंबर : गणरायाच्या निरोपानंतर गिरगाव चौपाटीवर दुसर्‍या दिवशी कचर्‍याचं 'विघ्न' दूर करण्याचं मोलाचं कार्य सोमय्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'स्वच्छता अभियाना'अंतर्गत या विद्यार्थ्यांनी एकदिवशीय स्वच्छता अभियान राबवलं.

एस.के.सोमय्या कॉलेजच्या 'उत्कर्ष' या गटाने गिरगाव चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. ज्यात 150 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.16 सप्टेंबर म्हणजेच अनंतचतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी गिरगाव आणि जुहु चौपाटीवर विद्यार्थ्यांनी हा स्वच्छता उपक्रम पार पाडला. विसर्जनानंतर चौपाटीवर कचर्‍याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यामुळेच या विद्यार्थ्यांनी समाजात बदल घडविण्याच्या हेतूने स्वयंप्रेरणेने परिसर स्वच्छ केला. पर्यावरण आणि देश स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असं आवाहनही या विद्यार्थ्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2016 08:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close