S M L

पंकजा मुंडे भुजबळांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

Sachin Salve | Updated On: Sep 21, 2016 02:21 PM IST

पंकजा मुंडे भुजबळांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई, 21 सप्टेंबर : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतलीये. पंकजा मुंडेंनी जेजे हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. सत्ताधारी पक्षाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात एकीकडे मराठा मोर्चाने महाराष्ट्र ढवळून निघालाय. तर दुसरीकडे दोन ओबीसी नेत्यांच्या भेटीमुळे राजकारणाच्या सारीपाटावर खळबळ उडालीये. मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आर्थर रोड जेलमध्ये न्यायलयीन कोठडीत आहे. मागील आठवड्यात शनिवारी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज पंकजा मुंडे पालघर दौ•यावर जाण्याच्या आधी थेट जेजे हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली.

भुजबळांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केल्याचं कळतंय. ही भेट राजकीय होती ही कौटुंबिक ? या प्रश्नाभोवती राजकीय चर्चांना उधाण आलंय. छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे मोठे नेते होते. हे दोन्ही नेते राजकीय विरोधक असले तरी ओबीसी प्रश्नावर एकत्र होते. राज्यात एकीकडे मराठा मोर्च्याने विराट रुपधारण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंच्या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2016 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close