S M L

सोलापुरात 5 रणरागिणींच्या नेतृत्वाखाली #एकमराठालाखमराठा

Sachin Salve | Updated On: Sep 21, 2016 02:53 PM IST

सोलापुरात 5 रणरागिणींच्या नेतृत्वाखाली #एकमराठालाखमराठा

सोलापूर, 21 सप्टेंबर : कोपर्डीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आरक्षणासहीत अन्य मागण्यांसाठी आज मराठा समाज सोलापूरमध्ये एकवटलाय. लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव एकत्र आले होते. विशेष म्हणजे या मोर्चाचं 5 रणरागिणींनी नेतृत्व केलं.

या मोर्चाचं नेतृत्व करणा•या पाच रणरागिणींनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चात सहभागी झाल्यात. मराठा-दलित असा कोणताही वाद नसून बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाचा आदर राखत आम्ही हा मोर्चा काढत असल्याचं त्यांनी सांगितलं. या मोर्चासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. मराठ्यांच्या राज्यभरातील इतर मोर्चांप्रमाणेच या मोर्चालाही उच्चांकी गर्दी होणार असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2016 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close