S M L

झटपट श्रीमंतीच्या लालसेपोटी बापच उठला लेकीच्या जीवावर!

Samruddha Bhambure | Updated On: Sep 21, 2016 11:14 PM IST

झटपट श्रीमंतीच्या लालसेपोटी बापच उठला लेकीच्या जीवावर!

नागपूर - 21 सप्टेंबर : झटपट श्रीमंतीच्या लालसेपोटी मांत्रिक महिलेशी संगनमत करून पोटच्याच मुलीचा नरबळी देण्याच्या प्रयत्न एका बापाने केला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडमध्ये हा प्रसंग घडल्याचं उघड झालं आहे.

राजेश आंबोने असं त्या नराधम वडिलांचं नाव आहे. राजेश व्यवसायानं पॅथॉलॉजी टेक्निशियन आहे, त्याला झटपट श्रीमंत व्हायचं होतं. याच परिसरात राहणारी मंदा गजभिये ही महिला दैवी शक्ती अंगात असल्याचा दावा करून अनेकांना फसवत होती. राजेश हा मंदाच्या संपर्कात आला आणि त्यालाही मंदाने झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवला. राजेशची 8 वर्षांची मुलगी त्रिशा हिचा खून करून तिचा मृतदेह पुरण्याचा सल्लाही, या महिलेने दिला आणि राजेशने त्याच्या प्रयत्न केला. मात्र ही बाब वेळीच त्रिशाच्या आईच्या, शिल्पा आंबोने हिच्या लक्षात आली. तिनं प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्रिशा या घटनेतून वाचली. यानंतर शिल्पानं पोलिसांमध्ये नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पण त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही. तो अजूनही फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2016 06:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close