S M L

अमरावतीतही '#एकलाखएकमराठा'चा एल्गार

Sachin Salve | Updated On: Sep 22, 2016 01:20 PM IST

5अमरावती, 22 सप्टेंबर : एकमराठा लाख मराठाचा एल्गार आज अमरावतीत घुमतोय. विदर्भात हा दुसरा मराठा क्रांती मोर्चा असून लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मूक मोर्च्यासाठी एकवटला आहे.

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या, ऍट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करा अथवा कायदा रद्द करा, मराठा समाजाला आरक्षण द्या या मागण्यांसाठी राज्यभरामध्ये मराठा मोर्चे सुरू आहेत. आज अमरावतीत मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाजातले बांधव अमरावतीत जमले आहेत. 1 हजार महाविद्यालयीन तरूणी या मोर्चात स्वयंसेवक म्हणून सहभागी झाल्यात. या मोर्च्यात 6 ते 7 लाख मराठा या मोर्चात सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विदर्भात हा मराठा क्रांती मोर्च्याचा दुसरा मोर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2016 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close