S M L

मुंबई,नवी मुंबईत हाय अलर्ट, फोर्स वनचं युनिट उरणकडे रवाना

Sachin Salve | Updated On: Sep 22, 2016 08:57 PM IST

मुंबई,नवी मुंबईत हाय अलर्ट, फोर्स वनचं युनिट उरणकडे रवाना

रायगड, 22 सप्टेंबर :  उरणमध्ये 5 संशयित बंदुकधारी घुसल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई,नवी मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी फोर्स वनचं युनिटही उरणकडे रवाना झालं आहे.

उरणमध्ये 5 संशयित घुसल्याची भीती व्यक्त होतोय. त्यांचा शोध सुरू आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी याबाबत दुजोरा दिला आहे. आज सकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास काही शाळकरी मुलांनी पाच संशयितांना शस्त्रांसह पाहिले. त्यामुळे पोलिसांनी उरण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलंय. हेलिकॉप्टरच्या मदतीनं हे शोधकार्य सुरू आहे. उरणमधल्या शाळा-कॉलेजला त्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. पोलीस आणि नौदलाकडून शोधकार्य सुरू पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. उरण शहरात जाणा•या तीनही मार्गांवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मुलांचे जबाब नोंदवल्यानंतर संशयितांचे रेखाचित्र मुलांच्या मदतीने काढले जात आाहेत. या सर्च ऑपरेशनसाठी पोलिसांचं फोर्सवन पथक उरणकडे रवाना झाले आहे.

एनपीटी, ओनजीसी आणि नौदलाचं शस्त्रागार असलेलं एनईडी, तसंच एलिफंटा बेटाजवळ असलेल्या पेट्रोलियमच्या टाक्या यामुळे हा भाग विशेष संवेदनशील मानला जातो. त्यामुळेच सर्व सुरक्षा यंत्रणा अगदी सतर्क आहेत. पोलिसांबरोबरच नौदलानेही उरणमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता, कोणत्याही अलर्टकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय.

उरण आणि आजूबाजूच्या परिसरात हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शोध घेतला जातोय. नौदलाच्या वेस्टर्न कमांडने मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड किनारपट्टीवर सर्वात जास्त दक्षतेचा, म्हणजेच हायेस्ट अलर्ट जारी केला आहे. शोधमोहिमेसाठी आवश्यक ती सर्व उपकरणे हलवली जात आहेत, तसंच नौदलानं राज्य पोलीस आणि तटरक्षक दलाशी समन्वय साधला असल्याचं सांगण्यात आलं. नौदलानं किनारपट्टी आणि समुद्रामध्ये तर पोलिसांनी प्रामुख्यानं शहरामध्ये शोधमोहीम राबवण्यावर लक्ष केंद्रीत केलंय. तसंच एटीएसचे अधिकारीही उरणमध्ये पोहोचले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2016 07:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close