S M L

मराठा आणि दलितांमध्ये ऐक्यासाठी परिषद बोलावणार -रामदास आठवले

Sachin Salve | Updated On: Sep 22, 2016 05:24 PM IST

मराठा आणि दलितांमध्ये ऐक्यासाठी परिषद बोलावणार -रामदास आठवले

22 सप्टेंबर : मराठा आणि दलितांमध्ये ऐक्य आणणे गरजेच आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऐक्य परिषदा घेणार आहे. याची सुरुवात शिर्डीतून करणार असून सर्व मराठा नेत्यांना बोलावणार आहे अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आयबीएन लोकमतवर केली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक मराठा लाख मराठा यासंदर्भात त्यांनी आयबीएन लोकमतवर आपलं मत माडलं. कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. मराठा आणि दलित समाजातील वाढती दरी कमी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऐक्य परिषदा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 7 ऑक्टोबरला शिर्डीत या परिषदेचं आयोजन केलंय अशी माहितीही आठवलेंनी दिली.

तर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र मराठा आरक्षणाचा विषय घेऊन विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडता येऊ शकत असल्याने विशेष अधिवेशनाची गरज नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर ऍट्रोसिटीच्या गैरवापरासाठी दलित समाजाला जबाबदार धरू नये अशीही भूमिका त्यांनी मांडलीय.

आठवलेंच्या मुलाखतीतील ठळक मुद्दे

- दलितांच्या मताशिवाय मराठा सत्तेवर येणार नाही

- मराठ्यांच्या मताशिवाय दलित निवडून येणार नाही .

- कोपर्डीच्या निर्भयाच्या कुटुंबियांना भेट द्यायला जात असताना मला भेटू दिलं नाही,ही खंत

- जेवढे काढायचे असतील तेवढे काढा मोर्चे... मला माहित तुम्ही आहात आमच्या वरचे

 पण आम्ही आहोत तुमच्या घरचे

- कोपर्डीच्या आरोपींना पकडून देण्याचं काम आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केलं

- मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाही

-नागपूर अधिवेशनात या विषयावर चर्चा करायला हवी

- महाराष्ट्रात सामाजिक वातावरण चांगलं ठेवण्यासाठी परिषद शिर्डीला आयोजित केली

- मराठा-दलित ऐक्य परिषदेचं आयोजन करणार, या परिषदेसाठी सर्वपक्षीय मराठा नेत्यांना बोलवणार

- सर्व जातीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अनेक चर्चा झाल्यानंतर 1989साली एट्रॉसिटीचा कायदा आला

- कायद्याची भिती वाटत असेल तर दलितांवर अत्याचार करू नका -रामदास आठवले

- दलितांकडून जर ऍट्रासिटी कायद्याचा दुरूपयोग होत असेल तर तेही चुकीचं -रामदास आठवले

- मुख्यमंत्र्यांविरोधात हे क्रांती मोर्चे नाहीत -रामदास आठवले

- बहुमत असल्यानं सरकारला धोका नाही -रामदास आठवले

- पुढील निवडणुकीत व्होटबँक बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा हा प्रयत्न

- या मोर्चात भाजप,सेनेतले लोक आहेत त्यामुळे राजकीय मोर्चे नाहीत -रामदास आठवले

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2016 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close