S M L

शेकाप नेते जयंत पाटलांनी घेतली भुजबळांची भेट

Sachin Salve | Updated On: Sep 22, 2016 09:41 PM IST

शेकाप नेते जयंत पाटलांनी घेतली भुजबळांची भेट

22 सप्टेंबर : राज्यात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चांच्या पार्श्वभूमीवर ओबीसींमध्येही काहिशी अस्वस्थता दिसून येतेय. पंकजा मुंडेंपाठोपाठ आज शेकापचे नेते जयंत पाटलांनीही जे जे रूग्णालयात जाऊन भुजबळांची भेट घेतली.

भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. आज जयंत पाटलांनी भेट घेतली.या दोन्ही नेत्यांनीही आपण फक्त भुजबळांच्या तब्यतेची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं सांगितलं असलं तरी या ओबीसी नेत्यांच्या भुजबळ भेटींमुळे राजकीय तर्कवितर्कांना चांगलंच उधान आलंय. दरम्यान, नाशिकमधल्या भुजबळ समर्थकांनी 3 ऑक्टोबरला ओबीसींचा मोर्चा काढणार असल्याचं असल्याचं सकाळीच जाहीर केलंय. त्यामुळे ओबीसी नेत्यांची भुजबळ भेट आणि ओबीसी मोर्चाची घोषणा या दोन्ही घटना म्हणजे निव्वळ योगायोग असं अजिबात म्हणता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2016 09:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close