S M L

उरणमध्ये घुसलेले हे 2 संशयित, दिसल्यास पोलिसांना कळवा !

Sachin Salve | Updated On: Sep 23, 2016 01:10 PM IST

उरणमध्ये घुसलेले हे 2 संशयित, दिसल्यास पोलिसांना कळवा !

uran_suspect_two

23 सप्टेंबर : उरीमधील दहशतवादी हल्ल्याला 4 दिवस उलटत नाही तोच रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये संशयित दहशतवाद्यांची हालचाल आढळून आली आहे. खबरदारी म्हणून आजही उरणमधल्या शाळा, कॉलेजेसला सुट्‌ट्या देण्यात आल्या आहे. संशयितांचे स्केच जारी केले आहे.

उरणमध्ये या संशयितांमुळे मुंबई, नवी मुंबईत हाय अलर्ट आहे. फोर्स वनचं युनिट उरणमध्ये पाच संशयितांचा शोध घेत आहे. त्याचसोबत पोलीस नौदलाचंही शोधकार्य सुरू आहे. पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे .पश्चिम नौदल कमांडने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड या किनारपट्टीच्या परिसरात अत्यंत दक्षतेचा इशारा जारी केला आहे. JNPT, ONGC आणि नौदलाचं शस्त्रागार असलेलं NED, तसंच एलिफंटा बेटाजवळ असलेल्या पेट्रोलियमच्या टाक्या यामुळे हा भाग विशेष संवेदनशील मानला जातो. त्यामुळेच सर्व सुरक्षा यंत्रणा अगदी सतर्क आहेत.

रेखाचित्र जारी

रायगड जिल्ह्यातील उरण शहरात संशयित बंदुकधारी घुसल्याच्या चर्चेनं खळबळ उडाली आहे.या संदर्भातील मुंबई पोलिसांनी दोन रेखाचित्र जारी केले आहे. ज्या विद्यार्थांनी या संशयितांना पाहिले होते त्यांच्या माहिती वरून ही रेखाचित्र तयार करण्यात आलीय.अद्याप तरी जे संशयित पाहिले गेले होते. त्या संदर्भात कोणताच सुगावा लागला नाही त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या संदर्भात कसून चौकशी करत आहे.

जनतेनं घाबरून जाऊ नये - मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरणच्या घटनेबाबत ट्विट केलंय. याबाबतीत मी पोलिसांशी बोललो असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. "पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि गुप्तचर संस्थांशी बोललो. सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. राज्य आणि केंद्रीय सुरक्षा बल एकमेकांशी समन्वय ठेवून काम करत आहेत. जनतेला न घाबरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2016 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close