S M L

मोदींची गच्छंती लांबली

20 एप्रिलआयपीएलचे कमिशनर ललित मोदीं यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितले जाईल, या अंदाजाला शरद पवार यांनी पुन्हा चकवा दिला आहे. मोदी यांच्या राजीनाम्याबाबत गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सर्वसहमतीने 26 एप्रिल रोजी निर्णय होईल, अशी माहिती पवारांनी आज दिली. याच मुद्द्यावर दिल्लीत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीला पवार यांचे जावई सदानंद सुळेही हजर होते. बैठकीनंतर आयपीएल घोटाळ्याप्रकरणी ललित मोदी यांच्यावरील कारवाईबद्दल चर्चा सुरू आहे, असे पवार यांनी मीडियाला सांगितले.दरम्यान ललित मोदीही मुंबईहून दिल्लीला गेले आहेत. ते संध्याकाळी शरद पवारांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे आयपीएलच्या टीमची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचनालयाची आठ पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके आयपीएलमधील परकीय चलनाच्या देवाण-घेवाणीची चौकशी करणार आहेत. त्याबाबतचा अहवाल अतिरिक्त संचालकांना सादर केला जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2010 09:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2010 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close