S M L

अहमदनगरमध्ये '#एकमराठालाखमराठा'ची त्सुनामी

Sachin Salve | Updated On: Sep 23, 2016 02:47 PM IST

अहमदनगरमध्ये '#एकमराठालाखमराठा'ची त्सुनामी

अहमदनगर, 23 सप्टेंबर : ज्या जिल्ह्यात कोपर्डी प्रकरण घडले त्या जिल्ह्यात आज मराठा क्रांती मोर्च्यात एक लाख एक मराठाची त्सुनामी आली. लाखोंच्या संख्येने मराठा समाज नगरमध्ये एकवटलाय. हा मोर्चा आजवरचा सगळ्यात मोठा मोर्चा ठरलाय. या मोर्च्यात 'निर्भया'चे आई-वडिलही सहभागी झाले होते.

कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी द्या, ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करा आणि मराठा आऱक्षण द्या या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर एकवटला आहे. आज संवेदनशील अहमदनगर जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा निघाला. शहरातील वाडिया पार्कमध्ये सर्व मराठा बांधव एकवटले. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मोर्चा ठरलाय. लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव या मोर्च्यात सहभागी झाले होते. या मोर्चात कोपर्डी निर्भयाचे कुटंुबियही सहभागी झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीमध्ये घडलेल्या घटनेनंतरच मराठा समाज ख•या अर्थाने ढवळून निघाला. त्यानंतरच आपल्या मागण्यांसाठी आग्रही होत मराठा समाज रस्त्यावर उतरला आणि त्यांनी आयोजित केलेल्या मोर्चांनी संपूर्ण राज्य व्यापून टाकलं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय आणि नेत्यांच्या सहभागाशिवाय निघालेल्या मोर्चांची दखल शासनाला घ्यावीच लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2016 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close