S M L

उरणमध्ये ‘त्या’ बोटीचा संशयितांशी संबंध नाही !

Sachin Salve | Updated On: Sep 23, 2016 01:41 PM IST

उरणमध्ये ‘त्या’ बोटीचा संशयितांशी संबंध नाही !

रायगड, 23 सप्टेंबर : उरणमध्ये पाच संशयित घुसल्यामुळे खळबळ उडाली आहे. या संशयितांचा शोध सुरू आहे. मात्र मोरा बंदराजवळ सापडलेल्या बोटीचा आणि संशयिताचा कोणताही संबंध नाही असं आता स्पष्ट झालंय.

उरणमध्ये मोरा बंदराजवळ सापडलेल्या बोटीबद्दल संदिग्धता निर्माण झाली होती. 7 सप्टेंबर रोजी मोरा बंदरात ही बोट बेवारसरित्या सापडली होती. त्यानंतरच उरणमध्ये पाच संशयित दहशतवादी आढळल्यामुळे त्यांचा या बोटीशी काही संबंध आहे का याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र या बोटीचा या संशयितांशी काहीही संबंध नसल्याचं राज्याच्या गृहविभागाने स्पष्ट केलंय.

ही बोट स्थानिक मच्छिमारांची होती. या बोटीतून चौघेजण जात असल्याना कस्टम अधिका•यांनी त्यांना हटकलं त्यानंतर ते ही बोट तिथेच सोडून पळून गेले. या बोटीचा वापर डिझेलची चोरी करण्यासाठी होत असल्याचं नंतर स्पष्ट झालं. त्यामुळे त्याचा उरणमध्ये दिसेलल्या व्यक्तींशी काहीही संबंध नाही हे आता स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2016 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close