S M L

नाशिकमध्ये विराट मराठा मूकमोर्चाला सुरुवात, हजारोंच्या संख्येनं जमले नागरिक

Samruddha Bhambure | Updated On: Sep 24, 2016 01:22 PM IST

नाशिकमध्ये विराट मराठा मूकमोर्चाला सुरुवात, हजारोंच्या संख्येनं जमले नागरिक

नाशिक - 23 सप्टेंबर :  राज्यात सध्या मराठा मोर्चांची लाट आली आहे. नाशकात तपोवनमध्ये मराठा मोर्चाला सुरूवात झाली आहे.  या मोर्चामध्ये उदयनराजे भोसले, संभाजी महाराज अशा दिग्गज मराठा नेत्यांची उपस्थिती आहे. लाखोच्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या मुद्द्यावर मराठा समाजाचा भव्य मोर्चा नाशिकमध्ये आज निघाला आहे.  नाशिक इथल्या तपोवन भागातून निघणारा मोर्चा आडगाव नाका ,रविवार कारंजा मार्गे जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकणार आहे. त्यानंतर गोल्फ क्लब मैदानावर या मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. या मोर्च्याला नगरसह इतर जिल्ह्यातील मोर्चापेक्षा देखील जास्त गर्दी राहिल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जेय्यत तयारी करण्यात आली आहे. मोर्चासाठी शहरातील वाहतूक मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तसंच, या मोर्चाला कुठलंही गालगोट लागू नये यासाठी सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.  जवळपास 1700 पोलिस कर्मचाऱ्यांसह 150 अधिकाऱ्यांचा बंदोबस्त या मोर्चासाठी लावण्यात आला आहे. या मोर्चाचा साठी अनेक शाळा आणि महाविदयलयाला सुट्टी जाहीर करण्यात आली असून या मोर्चात विद्याथ्यांची संख्या लकक्षणिक असण्याशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान,  मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक ही दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली असून शहरांतर्गत मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहे. मोर्चाचा समारोप होईपर्यंत वाहतूक मार्गातील बदल कायम राहणार आहे. मात्र, बंदी घातलेल्या मार्गावर पोलीस वाहन, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना परवानगी असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2016 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close