S M L

झी 'जिंदगी'वरच्या पाकिस्तानी कलाकारांच्या मालिका बंद करणार- झी मीडिया

Samruddha Bhambure | Updated On: Sep 24, 2016 04:45 PM IST

झी 'जिंदगी'वरच्या पाकिस्तानी कलाकारांच्या मालिका बंद करणार- झी मीडिया

24 सप्टेंबर –  उरीतील भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळलेली असताना, 'झी' मीडियाने आपल्या 'जिंदगी' या चॅनलवरून पाकिस्तानी कलाकारांच्या मालिका बंद करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

जम्मू काश्मीरमधल्या उरी इथं अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले. त्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना येत्या ४८ तासांत भारत सोडण्याचा अल्टिमेटमकालच दिला होता. त्यापाठोपाठ आता झी 'जिंदगी' चॅनलवरील पाकिस्तानी कलाकारांच्या मालिका बंद करण्याचा विचार असल्याचं ‘झी’ आणि ‘एस्सेल ग्रुप’चे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी आज सांगितलं आहे. त्यांनी  ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

झी 'जिंदगी'वर सध्या ‘बिन तेरे’, ‘एक तमन्ना लहसील सी’, ‘फात्मागुल’, ‘मै हरी पिया’ या मालिका प्रसारित होतात. दोन वर्षांपूर्वी ‘जिंदगी गुलजार है’ ही अभिनेता फवाद खानची मुख्य भूमिका असलेली मालिका प्रचंड गाजली होती.

 

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ जे बोलले, ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच 'जिन्दगी'वरील पाकिस्तानी मालिका बंद करण्याबाबत झी विचार करतंय. तसंच, पाकच्या कलाकारांनी भारत सोडून जावं, या भूमिकेचंही आम्ही समर्थन करतो, असं ट्विट डॉ. सुभाष चंद्रा यांनी सकाळी केलं. त्यावरून त्यांचं अभिनंदन होतंय.

 

झी उद्योग समुहाचे मालक  सुभाष चंद्रा हे नुकतेच हरियाणामधून भाजपतर्फे राज्यसभेत खासदार म्हणून निवडून गेले आहे. त्यांच्याच एका चॅनलवर पाकिस्तानी कलाकारांच्या मालिका प्रक्षेपीत होत असल्याने त्यांची राजकिय अडचण होण्याची शक्यता होती. त्यामुळे संयुक्त राष्ट्रात पाकने घेतलेल्या देशविरोधी भूमिकेनंतर झी समूहाने आपल्या 'जिंदगी' या चॅनलवरून पाकिस्तानी कलाकारांच्या मालिकांचं प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2016 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close