S M L

रेल्वेखाली येणाऱ्या तरुणीला पोलिसांनी वाचवले

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2016 09:50 PM IST

रेल्वेखाली येणाऱ्या तरुणीला पोलिसांनी वाचवले

पुणे, 25 सप्टेंबर : धावत्या ट्रेनमध्ये चढू नका असं रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जातं. पण तरीही प्रवाशी जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करतातच. लोणावळा स्टेशनवर धावत्या रेल्वेतून पडलेल्या तरुणीला पोलिसांनी सुखरुप वाचवले.

सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी काकिनाडा एक्स्प्रेस गाडी लोणावळा रेल्वे स्थानकात आली. दोन मिनिटाचा थांबा घेऊन सदर गाडी मुंबईच्या दिशेने पुढे निघाली. सदर गाडी वेग घेत असतानाच एक वृद्ध व्यक्ती गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात गाडीमधून खाली फलाटावर पडला. फलाटावर उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी त्याला बाजूला घेतला. त्यावेळी तेथे झालेल्या गोंधळाच्या आवाजाने बाजूलाच बसलेले लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय गायकवाड आणि पवन तायडे हे तिघे पुढे येत असतानाचा त्यांच्या समोरच याच धावत्या ट्रेनच्या दुस•या एका डब्यामधून एक युवक आणि युवती उतरण्याच्या प्रयत्नात खाली फलाटावर पडले. यातील युवक ट्रेनपासून दूर पडला मात्र युवती ही धावत्या ट्रेन खाली खेचली गेली. हे चित्र बघतच पो.कॉन्स्टेबल पवन तायडे याने पुढे धावत जावून या युवतीला बाहेर खेचून काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2016 09:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close