S M L

मुंबईत सापडल्या 66 ब्रिटिशकालीन टाक्या

Samruddha Bhambure | Updated On: Sep 26, 2016 11:56 PM IST

मुंबईत सापडल्या 66 ब्रिटिशकालीन टाक्या

26 सप्टेंबर : मुंबईच्या भूगर्भात एक - दोन नाही तर तब्बल 66 पाण्याच्या टाक्यांचा शोध लागला आहे. यातील प्रत्येक टाकीची क्षमता जवळपास अडीच लाख लीटरची आहे. मात्र, पालिकेला आत्तापर्यंत या टाक्यांबाबत काहीच माहिती नव्हती.

काही दिवसांपूर्वी कुलाबा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या आवारात पाण्याची टाकी असल्याची माहिती मिळाली. शिवसेनेचे नगरसेवक अवकाश जाधव यांना ही टाकी सापडली त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोहीम हाती घेण्यात आली. त्यात या संग्रहालयाच्या आवारात पाण्याच्या टाकीचा शोध लागला. ही टाकी 10 मीटर बाय 10 मीटर लांबी, रुंदीची असून तिची खोली तीन मीटर इतकी आहे.

त्यानंतर, मुंबईतील आणखी काही ठिकाणी अशाच काही टाक्या आहेत का याचा शोध सुरू झाला. टाक्या कुठे कुठे आहेत याचा एक नकाशा सापडला. त्यामधून मुंबईच्या केवळ 'ए' वॉर्ड मध्येच पाण्याच्या सहा टाक्या असल्याची माहिती समोर आली. तर 'ए' ते 'जी' वॉर्ड्समध्ये एकूण 66 टाक्या सापडल्या आहेत, असं अवकाश जाधव यांनी IBN लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. मात्र, यातील 13 पाण्याच्या टाक्यांचा शोध घेणं कठीण जातंय, अशी माहिती जाधव यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2016 02:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close