S M L

किवीचा धुव्वा उडवत भारताचा पाकलाही दणका, टेस्टमध्ये भारत वर्ल्ड नंबर वन !

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2016 06:13 PM IST

किवीचा धुव्वा उडवत भारताचा पाकलाही दणका, टेस्टमध्ये भारत वर्ल्ड नंबर वन !

 26 सप्टेंबर : ऐतिहासिक 500 व्या कसोटीत भारताने न्युझीलंडवर दणदणीत विजय मिळवत पहिली कसोटी खिश्यात घातलीये. भारताने न्युझीलंडवर 197 धावाने विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतलीये. या विजयासह भारताने टेस्ट रँकिंगमध्ये पाकिस्तानला मागे टाकत वर्ल्ड नंबरवर कब्जा मिळवला आहे.

कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये 5 व्या दिवशी न्युझीलंडची टीम दुस•या इनिगमध्ये 87.3 ओव्हरमध्ये सर्वबाद 236 अशी अवस्था झाली. टीम इंडियाकडून आर.अश्विनने सर्वाधिक 6 विकेट घेतल्यात. तर मोहम्मद शामीने 2 विकेट घेतल्यात.

या आधी भारताने पहिल्या इनिंगमध्ये 318 आणि दुस•या इनिंगमध्ये 377 धावा बनवल्या होत्या. 434 धावांचा पाठलाग करणा•या न्युझीलंड टीमची सुरुवात खराब राहिली. अवघ्या 3 धावावर न्युझीलंडचे 2 खेळाडू पव्हेलियनमध्ये परतले. न्युझीलंडचा कर्णधार विलियम्सनला 25 धावांवर आऊट करुन आश्विनने टेस्ट करिअरमधली 20 विकेटचा टप्पा पूर्ण केला. या विजयासह भारताने वर्ल्ड टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये पाकिस्तानला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर झेप घेतलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2016 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close