S M L

भुजबळांच्या अडचणीत वाढ, हायकोर्टाने नाकारला अंतरिम जामीन

Samruddha Bhambure | Updated On: Sep 27, 2016 03:41 PM IST

bhujbal_arrested

27 सप्टेंबर : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांना आज (मंगळवारी) आणखी दोन धक्के बसले आहेत. भुजबळांचा अंतरिम जामीन हायकोर्टाने नाकारला आहे.

PMLA कायद्यातल्या काही कलमांच्या वैधानिक तरतुदींना भुजबळांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यादरम्यान भुजबळांनी जामीन मिळावा अशी विनंती कोर्टाला केली होती.पण कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळलीये. यासंदर्भात 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत.

तर दुसरीकडे एमईटी जमीन  गैरव्यवहार प्रकरणात होत असलेल्या सुनावणीत आर्थिक गुन्हे विभाग आणि लाचलुचपत विभागाचा अहवाल कोर्टात सादर झाला आहे. यावरच्या कारवाईवर मुंबईचे पोलीस आयुक्त निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता रोहित देव यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2016 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close