S M L

फवाद खान चुपचाप पाकिस्तानला परतला

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2016 07:32 PM IST

फवाद खान चुपचाप पाकिस्तानला परतला

27 सप्टेंबर : उरी हल्ल्यानंतर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन पुकारल्यामुळे पाकिस्तानी अभिनेता फवाद खान मायदेशी परतलाय. एएनआय वृत्तसंस्थेनं याबाबत दुजोरा दिलाय.

उरी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली होती. मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांत देश सोडण्याचा इशारा दिला होता. तसंच पाक कलाकार असलेले चित्रपट चालू देणार नाही असंही मनसेनं स्पष्ट केलं होतं.

मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर झी मीडियाने पाकिस्तानी कलाकार असलेल्या मालिकांवर बंदी घातली. आता 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटात भूमिका साकारणारा पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने पाकिस्तानाला चुपचाप परतलाय. 'ऐ दिल है मुश्किल' चं प्रमोशन लवकरच सुरू होणार आहे मात्र यावेळी गैरहजर राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2016 07:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close