S M L

संजय राऊतच कार्टून, आशिष शेलारांचं शरसंधान

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2016 07:44 PM IST

संजय राऊतच कार्टून, आशिष शेलारांचं शरसंधान

27 सप्टेंबर : मराठा मोर्चावरील 'सामना'तील व्यंगचित्रामुळे शिवसेना अडचणीत आलीये. याच मुद्द्यावरुन भाजपचे मुंबईचेअध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलंय. संजय राऊतच कार्टून आहे अशी खिल्ली शेलार यांनी उडवलीये.

मराठा मूक मोर्चावर शिवसेनेनं आपल्या मुखपत्र असलेल्या सामनामध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध केल्यामुळे मराठा समाजाचा रोष ओढावून घेतलाय. असं असताना आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी ट्विटद्वारे

संजय राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊत हे कार्टून असल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय. सामनाच्या कार्यकारी संपादकांचे आजवरचे उपद्‌व्याप पाहता त्यांना कार्टून म्हणावंसं वाटतं असा टोला शेलारांनी लगावलाय. संजय राऊतांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणीही केलीये.

आशिष शेलार यांचं ट्विट

" कार्यकारी संपादकांचा आजपर्यंतचे उपद्‌व्याप पाहता त्यांनाच `कार्टून` म्हणावेसे वाटते. त्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्यात. त्यांनी जाहीर माफी मागावी."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2016 07:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close