S M L

दप्तराचं ओझं कमी करा, 12 वर्षांचा ऋग्वेद बसणार उपोषणाला

Sachin Salve | Updated On: Sep 28, 2016 06:45 PM IST

दप्तराचं ओझं कमी करा, 12 वर्षांचा ऋग्वेद बसणार उपोषणाला

नागपूर, 28 सप्टेंबर : दप्तराचं ओझं कमी करावं या मागणीची मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री दखल घेत नसल्यानं चंद्रपुरातील 12 वर्षांच्या चिमुरड्यानं आंदोलनाचं हत्यार उपसलंय. 12 वर्षांचा ऋग्वेद राईकवार हा गांधी जयंतीपासून नागपुरात आंदोलनाला बसणार आहे. पोलिसांनी त्याला परवानगी नाकारलीय. तरीही उपोषणाला बसणारच असा पवित्रा ऋग्वेदनं घेतलाय.

शाळकरी मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पत्रकार परिषद घेणा•ऱ्या ऋग्वेद राईकवार या विद्यार्थ्याने त्याची कैफियतीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली नसल्यामुळे आमरण उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरच्या संविधान चौकात 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी ऋग्वेद राईकवार हा उपोषण करणार आहे. नागपूर पोलिसांकडे ऋग्वेद उपोषणासाठी परवानगी मागण्यासाठी आला होता. पण पोलिसांनी तो 12 वर्षांचा असल्यामुळे त्याला परवानगी दिली नाही. ऋग्वेदला त्याच्या पालकांनी आणि शाळेने उपोषणासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी जरी परवानगी नाकारली तरी आपण लहान मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपोषणावर बसणारच असे त्याने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2016 06:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close