S M L

मोदींसाठी काँग्रेसची फिल्डिंग

20 एप्रिलकोची टीमच्या वादातून शशी थरूर यांची गच्छंती झाल्यानंतर, आता आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांची विकेट काढण्यासाठी काँग्रेसने जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी शरद पवार यांच्यावर दबाव आणण्यासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यांची आज दिल्लीत भेट घेतली. ललित मोदींना पदावरून हटवलेच पाहिजे, असे त्यांनी पवारांना ठणकावल्याचे समजते. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मोदींना हटवण्याच्या निर्णयावर बीसीसीआयच्या बहुतेक पदाधिकार्‍यांचा शशांक मनोहर यांना पाठिंबा आहे. त्यामुळे शशांक मनोहर यांच्या भेटीनंतर अखेर, मोदींच्या भूमिकेबाबत पलटी खात पवारांनी मोदींना हटवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच, संध्याकाळी ललित मोदी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. आणि मी पदावर राहणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. आयपीएल कमिशनरपदाच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असेही ते ठामपणे म्हणाले. आयसीसीच्या बैठकीसाठी ललित मोदी दुबईला गेले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2010 05:43 PM IST

मोदींसाठी काँग्रेसची फिल्डिंग

20 एप्रिल

कोची टीमच्या वादातून शशी थरूर यांची गच्छंती झाल्यानंतर, आता आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांची विकेट काढण्यासाठी काँग्रेसने जोरदार फिल्डिंग लावली आहे.

त्यासाठी शरद पवार यांच्यावर दबाव आणण्यासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यांची आज दिल्लीत भेट घेतली. ललित मोदींना पदावरून हटवलेच पाहिजे, असे त्यांनी पवारांना ठणकावल्याचे समजते.

त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मोदींना हटवण्याच्या निर्णयावर बीसीसीआयच्या बहुतेक पदाधिकार्‍यांचा शशांक मनोहर यांना पाठिंबा आहे.

त्यामुळे शशांक मनोहर यांच्या भेटीनंतर अखेर, मोदींच्या भूमिकेबाबत पलटी खात पवारांनी मोदींना हटवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच, संध्याकाळी ललित मोदी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. आणि मी पदावर राहणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.

आयपीएल कमिशनरपदाच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असेही ते ठामपणे म्हणाले. आयसीसीच्या बैठकीसाठी ललित मोदी दुबईला गेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2010 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close