S M L

पाकिस्तानी कलाकार काही दहशतवादी नाही, सलमानला पाक कलाकारांचा पुळका

Sachin Salve | Updated On: Sep 30, 2016 04:53 PM IST

पाकिस्तानी कलाकार काही दहशतवादी नाही, सलमानला पाक कलाकारांचा पुळका

30 सप्टेंबर : पाकिस्तानी कलाकार काही दहशतवादी नाही अशी पाठराखण करत अभिनेता सलमान खाननं पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देऊन नव्या वादाला तोंड फोडलंय.

उरी हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्याचा इशारा दिला होता. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाक अभिनेता फवाद खानने मायदेशी परतली. मात्र, आज अभिनेता सलमान खानने पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण केली. पाकिस्तानी कलाकारांवर घालण्यात आलेल्या बंदीला सलमान खाननं विरोध केलाय. पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाहीत. पाकिस्तानी कलाकार रितसर व्हिसा घेऊन भारतात येतात. त्यामुळे त्यांच्यावर बंदी योग्य नसल्याचं सलमान खाननं म्हटलंय. सलमान खानच्या या पाकिस्तानी कलाकारधार्जिण्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2016 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close