S M L

चंदू चव्हाण यांचं छतही हरपलं, पाकच्या ताब्यात बातमीमुळे आजीचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Sep 30, 2016 06:13 PM IST

चंदू चव्हाण यांचं छतही हरपलं, पाकच्या ताब्यात बातमीमुळे आजीचा मृत्यू

धुळे, 30 सप्टेंबर : भारतीय जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानात अटक झाल्याच्या वृत्ताच्या धक्क्यानं त्यांच्या आजीचा मृत्यू झालाय. लीलाबाई पाटील असं त्यांच्या आजीचं नाव आहे. चंदू धुळे जिल्ह्यातल्या बोरविहीर गावचे रहिवासी आहेत. चंदू यांचे आईवडील नाहीत. त्यामुळे आजीनंच त्यांचा सांभाळ केला. चंदू यांना पाकिस्तानी सैन्यानं पकडल्याचं वृत्त आल्यानंतर त्याचा त्यांना धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

चंदू बाबुलाल चव्हाण (22) याचे मूळ गाव सामनेर ता.पाचोरा जि.जळगाव आहे. दरम्यान, चंदू लहान असतानाच त्याच्या आई, वडिलांचे निधन झाले आहेत. तो बोरविहीर येथे मामाच्या घरीच वाढला. तेथेच त्याचे शिक्षण झाले. त्याचा भाऊ भूषण हा सुद्धा भारतीय सैन्यात जामनगरला कार्यरत आहे. बहिणीचा विवाह झाला आहे. चंदू हा तीन वर्षापूर्वी सैन्यात भरती झाला. त्याचे ट्रेनिंग अहमदनगर येथे झाले. सध्या तो पुंछ या राष्ट्रीय रायफल्स 36 बटालियन मध्ये कार्यरत आहे. दोन दिवसांपूर्वी जवान चंदू हा बेपत्ता आहे. जवान चंदू हा गोळीबार करतांना पाकिस्तानच्या सीमेत दाखल झाल्याने पाकिस्तानी सैनिकांनी त्याला पकडल्याचे वृत्त आहे. तसंच चंदू चव्हाण हा बेपत्ता असल्याची बातमी कळताच धक्क्याने त्यांची आजी लिलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2016 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close