S M L

भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये 3 ऑक्टोबरला मूकमोर्चा

Sachin Salve | Updated On: Oct 1, 2016 03:34 AM IST

bhujbal_arrested30 सप्टेंबर : मनी लाँड्रिंग प्रकरणात कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये 3 ऑक्टोबरला विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मागासवर्गीय, ओबीसी आणि बहुजन समाजातले त्यांचे समर्थक हा मोर्चा काढणार आहेत. त्या निमित्तानं आज भुजबळ समर्थकांनी नाशिकमध्ये मोटार सायकल रॅली काढली.

या रॅलीत महिला आणि युवकांची संख्या मोठी होती. बळी मंदिर भागातून निघालेली ही रॅली आडगाव पंचवटी भागात काढण्यात आली. 3 ऑक्टोबरला काढण्यात येणा•या मोर्च्यात जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातुन 2 लाखांपेक्षा अधिक भुजबळ समर्थक सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं. भुजबळांवर अन्याय होत असून त्यांची तुरूंगातून सुटका करावी अशी प्रमुख मागणी या मोर्चात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी भुजबळांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2016 10:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close