S M L

इतकाच पुळका असेल तर पाकिस्तानला जा, राज ठाकरेंनी सलमानला फटकारलं

Sachin Salve | Updated On: Oct 1, 2016 08:41 PM IST

इतकाच पुळका असेल तर पाकिस्तानला जा, राज ठाकरेंनी सलमानला फटकारलं

 

01 ऑक्टोबर : पाकिस्तानी कलाकार हे काय ढगातून कोसळले आहे का ? पाकिस्तान कलाकारांचा इतकाच जर पुळका आला असले तर पाकिस्तानात जाऊन शुटिंग करावं अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलमान खानवर सडकून टीका केली. तसंच सलमानने आधी देशाबद्दल अभिमान बाळगावा अशीच जर ट्विटिव सुरू राहिली तर चित्रपटांवर बहिष्कार घातला जाईल असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाही असं म्हणत अभिनेता सलमान खानने पाक कलाकारांची पाठराखण केली होती. सलमानच्या या भूमिकेमुळे त्याच्यावर चोहीबाजूने टीका होत आहे. सलमानचे वडील सलीम खान यांचे चांगले मित्र असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलमान खानला चांगलेच फटकारून काढले.

पाकिस्तानी कलाकार हे खबरे असू शकत नाही ते कशावरुन सांगता येईल. पाक कलाकारांचा इतकाच जर पुळका आला असेल तर सलमानने पाकिस्तानमध्ये जावं तिथे परिमट घेऊन शुटिंग करावं. आपले जवान शहीद झाले त्याबद्दल कधी बोलला नाही. कधी शहिदांना श्रद्धांजली वाहिली नाही. नुसता पाकिस्तान टेरेटरी हा धंदा सुरू केलाय अशा परखड शब्दात राज ठाकरे यांनी सलमानला फटकारुन काढलं.

तसंच बजरंगी भाईजानमध्ये पाकिस्तानात जाऊन एका मुलीला सोडून आला असं दाखवण्यात आलं होतं. पण या चित्रपटाचं शुटिंग भारताचं केलं होतं. मग पाकिस्तानात का शुटिंग करायला गेला नाही. कारण तिथे त्यांना परवानगी दिली जात नाही. कलाकारांना कोणती सीमा नसते म्हणे, पण पाक कलाकार काय ढगातून कोसळले आहे का ? कावेरीच्या पाण्याचा मुद्दा पेटला होता तेव्हा रजनीकांतसह सगळे कलाकार रस्त्यावर उतरले होते. ते स्वत: च्या राज्याच्या पाण्यासाठी उभे राहिले. यांना देशासाठी उभं राहता येत नाही अशी टीका सुद्धा राज ठाकरे यांनी केली.

धोनी चित्रपटावर पाकमध्ये बंदी घालण्यात आली. मग यांचे कसे सिनेमे पाकमध्ये कसे चालता ?. जेव्हा आयपीएलमध्ये पाक खेळाडूंना बंदी घालण्यात आली. तेव्हा पाक खेळाडू चांगले आहे त्यांना खेळू द्या असं कोणताही भारतीय खेळाडू बोलला नाही. मग सलमानलाच कसा पाक कलाकारांचा पुळका येतो ? सलमानच्या चित्रपटावर बहिष्कार घातला पाहिजे. तेव्हाच ही लोकं सुधरतील असा इशाराही राज यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2016 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close