S M L

सामनातल्या कार्टूनबद्दल अखेर संजय राऊत यांनीही व्यक्त केली दिलगिरी

Samruddha Bhambure | Updated On: Oct 2, 2016 07:13 PM IST

sanjay_raut_on_bjp

मुंबई - 02 ऑक्टोबर :  'सामना'तील व्यंगचित्रावरून मराठा समाजातील नाराजी आणि विरोधीपक्षांच्या आरोपानंतर अखेर आज (रविवारी) 'सामना'चे संपादक खासदार संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर राऊत यांनी आज तसं पत्रक प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली.

इतर बाहेरच्या लोकांनी केलेले लिखाण किंवा व्यंगचित्रांची नैतिक जबाबदारी 'सामना'ने कधीच झटकलेली नाही. म्हणून 'सामना'तील व्यंगचित्रावरून 'मराठा' समाज आणि खास करून माता-भगिनींचा अपमान झाला असेल तर स्वतः दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकतो, असं संजय राऊत यांनी पत्रकात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2016 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close