S M L

नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चा

Samruddha Bhambure | Updated On: Oct 3, 2016 02:20 PM IST

नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चा

नाशिक - 03 ऑक्टोबर : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी आज (सोमवारी) नाशिक मध्ये विराट मूक मोर्चा काढला आहे.

छगन भुजबळ यांची पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या भेटीनंतर या मोर्चाला ओबीसीचा मोर्चा म्हणून बघितलं जातं आहे. या मोर्चात देशभरातून लाखो भुजबळ समर्थक सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातंय.

लक्ष्मीनारायण मंदिर तपोवन इथून या मोर्चाची सुरवात होईल, त्यानंतर मारुती मंदीर,जुना आडगाव नाका,पंचवटी कारंजा, मालेगाव बस स्थानक इथून रविवार कारंजा, एम.जी.रोड मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय जाणार असून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिलं जाणार आहे. या वेळी 1 हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवकांचा सहभाग असून मोर्चाच्या मार्गावर प्रथमोपचार व्यवस्थेसाठी 80 डॉक्टर, 20 रुग्णवाहिका असणार आहे.

दरम्यान, हा मोर्चा कुठल्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून भुजबळ समर्थकांचा हा मोर्चा असल्याचं आयोजकांचं म्हणणं असलं तरी बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेल्या भुजबळांना सोडण्यात यावं, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावण्यात येऊ नये, ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण थांबवा, अशा अनेक मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2016 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close