S M L

आज डी.वाय.वर सेमीफायनल

21 एप्रिलनवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज सेमीफायनल रंगणार आहे ती मुंबई इंडियन्स आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स यांच्यात. पण खरी लढाई असेल ती सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळेदरम्यान. पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेल्या मुंबई इंडियन्सला यावेळी पुन्हा एकदा घरच्या प्रेक्षकांचा पाठींबा असणार आहे.लीग मॅचेसमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवत मुंबई इंडियन्सने सेमी फायनलमध्ये धडक मारली. मुंबईचा लीगमधील प्रवास पाहिला तर घरच्या प्रेक्षकांच्यासमोर त्यांची कामगिरी जबरदस्त झाली. मुंबईत झालेल्या मॅचमध्ये त्यांची सांघिक कामगिरी दिसून आली. त्यातच त्यांचा कॅप्टन सचिन तेंडुलकरचा फॉर्मही जबरदस्त आहे.पण लीगच्या शेवटच्या मॅचमध्ये मुंबईला केकेआरकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यातच त्यांची बॉलिंग, बॅटींग आणि फिल्डींग या तिन्ही क्षेत्रात त्यांची कामगिरी खराब झाली. त्यामुळे सेमी फायनलसाठी याची पुनरावृत्ती मैदानात होणार नाही याची काळजी आता त्यांना घ्यावी लागणार आहे.दुसरीकडे बंगलोरलाही लीगमधील आपल्या शेवटच्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र टीम होती मुंबई इंडियन्स. या मॅचमध्ये बंगलोरला रन्सचा पाठलाग करता आला नव्हता. आणि कागदावर कणखर दिसणारी त्यांची बॅटींग लाईन अप मैदानात मात्र फ्लॉप ठरली. त्यामुळे सेमी फायनल जिंकण्यासाठी त्यांच्या बॅट्समनला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.सेमी फायनलचे पडघम आता नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर वाजू लागले आहेत. आणि मॅच घरच्या मैदानावर असल्याने मुंबई इंडियन्स फेव्हरेट असणार हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 01:31 PM IST

आज डी.वाय.वर सेमीफायनल

21 एप्रिल

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज सेमीफायनल रंगणार आहे ती मुंबई इंडियन्स आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स यांच्यात.

पण खरी लढाई असेल ती सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळेदरम्यान. पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेल्या मुंबई इंडियन्सला यावेळी पुन्हा एकदा घरच्या प्रेक्षकांचा पाठींबा असणार आहे.

लीग मॅचेसमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवत मुंबई इंडियन्सने सेमी फायनलमध्ये धडक मारली. मुंबईचा लीगमधील प्रवास पाहिला तर घरच्या प्रेक्षकांच्यासमोर त्यांची कामगिरी जबरदस्त झाली.

मुंबईत झालेल्या मॅचमध्ये त्यांची सांघिक कामगिरी दिसून आली. त्यातच त्यांचा कॅप्टन सचिन तेंडुलकरचा फॉर्मही जबरदस्त आहे.

पण लीगच्या शेवटच्या मॅचमध्ये मुंबईला केकेआरकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यातच त्यांची बॉलिंग, बॅटींग आणि फिल्डींग या तिन्ही क्षेत्रात त्यांची कामगिरी खराब झाली. त्यामुळे सेमी फायनलसाठी याची पुनरावृत्ती मैदानात होणार नाही याची काळजी आता त्यांना घ्यावी लागणार आहे.

दुसरीकडे बंगलोरलाही लीगमधील आपल्या शेवटच्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र टीम होती मुंबई इंडियन्स. या मॅचमध्ये बंगलोरला रन्सचा पाठलाग करता आला नव्हता. आणि कागदावर कणखर दिसणारी त्यांची बॅटींग लाईन अप मैदानात मात्र फ्लॉप ठरली.

त्यामुळे सेमी फायनल जिंकण्यासाठी त्यांच्या बॅट्समनला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

सेमी फायनलचे पडघम आता नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर वाजू लागले आहेत. आणि मॅच घरच्या मैदानावर असल्याने मुंबई इंडियन्स फेव्हरेट असणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close