S M L

किवींना धूळ चारत भारताने कसोटी मालिका जिंकली, कसोटीचा 'ताज'ही जिंकला

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2016 08:05 PM IST

किवींना धूळ चारत भारताने कसोटी मालिका जिंकली, कसोटीचा 'ताज'ही जिंकला

03 ऑक्टोबर : पहिल्या कसोटीपाठोपाठ दुस•ऱ्याही कसोटीतही भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत कसोटी मालिका खिश्यात घातलीये. भारताने 178 रन्सनं न्यूझीलंडचा पराभव केलाय. या विजयासह भारताने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेत कसोटीचा 'ताज' काबीज केलाय.

कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर दुसरी कसोटी खेळवली गेली. चौथ्या दिवशी भारताने न्युझीलंडपुढे विजयासाठी 339 धावांचं लक्ष ठेवलं होतं. 339 रन्सचा पाठलाग करणारी न्युझीलंडची टीम 197 धावांवरच गारद झाली. भारताकडून दुस•या इनिंगमध्ये अश्विन,जाडेजा आणि मोहम्मद शामीनं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

याआधी न्युझीलंडची टीम दुस•ऱ्या इनिंमध्ये 263 रन्सवर ऑलआऊट झाली होती. त्यानंतर बॅटिंगसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्माने सर्वाधिक 82 रन्स केले तर विराट कोहली 45 रन्स बनवू शकला. रिद्धीमान साहाने सलग दुस•ऱ्या कसोटीमध्ये हाफ सेंच्युरी ठोकली. साहाने 58 रन्सवर नाबाद राहिला.

तीन कसोटीच्या मालिकेमध्ये भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेत मालिका खिश्यात घातलीये.. या विजयासोबतच भारतानं आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थानही मिळवलंय. तर पाकिस्तानला दुस•या स्थानावर फेकले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2016 07:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close