S M L

कर्मचारी कपातीचा निर्णय जेटने मागे घेतला

17 ऑक्टोबर, मुंबई - एकोणीसशे कर्मचा-यांच्या कपातीचा निर्णय जेट एअरवेजनं काल अखेर मागे घेतला आहे. जेटचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी मुंबईत रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. कंपनीला सध्या आर्थिक संकाटाने घेरलं आहे. दरम्यान जेट कर्मचा-यांच्या पगारात पंधरा ते वीस टक्के कपात करण्याची चर्चा आहे. मात्र नरेश गोयल यांनी या कपातीबाबत कुठलंही स्पष्टीकरण यावर दिलं नाही. मात्र कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने 'कॉस्ट कटींग' करावं लागेल असं सांगत त्यांनी पगारात कपातीचे संकेत त्यांनी दिले. याचबरोबर आर्थिक संकटातून सावरण्यासाठी सरकारी मदतीची अपेक्षाही व्यक्त केली.किंगफिशर आणि जेट दरम्यान झालेल्या कराराचा या निर्णयाशी काहीही संबंध नव्हता असंही गोयल यांनी स्पष्ट केलं. पण जेट मॅनेजमेंटनं घेतलेल्या निर्णयाची आपल्याला माहितीच नव्हती हा गोयल यांचा खुलासा धक्कदायक आहे. असं असलं तरी जेटच्या एका निर्णयाने भवितव्य धोक्यात आलेल्या सर्वच कर्मचा-यांना दिलासा मिळाला आहे. तर नरेश गोयल यांनीही भावनिक आवाहन करत कंपनीच्या वाईट काळात सर्व कर्मचा-यांच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2008 04:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2008 04:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close