S M L

कोकणात आणखी दोन औष्णिक वीज प्रकल्प

21 एप्रिलकोकणात औष्णिक प्रकल्पांविरुद्ध आंदोलन सुरू असतानाच आता आणखी दोन औष्णिक वीज प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केलेल्या पुण्याच्या टियाना कंपनीचे हे प्रोजेक्ट आहेत. यापैकी एक प्रकल्प 1500 मेगावॅट क्षमतेचा आणि 6 हजार कोटींहून जास्त गुंतवणूक असलेला आहे.हा प्रकल्प होणार आहे, दापोलीजवळच्या अतिशय निरर्गरम्य आंजर्ले गावात. त्यासाठी सुमारे अडीच हजार एकर जमीन संपादीत केली जाणार आहे. तर याच कंपनीकडून दाभोळ मध्ये 2 हजार मेगावॅट क्षमतेचा आणि 9 हजार कोटी गुंतवणुकीचा दुसरा औष्णीक वीज प्रकल्पही उभारला जाणार आहे.टीयाना कंपनीच्या अधिकार्‍यांनी आज रत्नागिरीत यासंबंधी घोषणा केली. उर्जा मंत्रालयाकडून टीयाना कंपनीला या संबंधात लवकरच परवानगी मिळणार असल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 02:00 PM IST

कोकणात आणखी दोन औष्णिक वीज प्रकल्प

21 एप्रिल

कोकणात औष्णिक प्रकल्पांविरुद्ध आंदोलन सुरू असतानाच आता आणखी दोन औष्णिक वीज प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे.

ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केलेल्या पुण्याच्या टियाना कंपनीचे हे प्रोजेक्ट आहेत.

यापैकी एक प्रकल्प 1500 मेगावॅट क्षमतेचा आणि 6 हजार कोटींहून जास्त गुंतवणूक असलेला आहे.

हा प्रकल्प होणार आहे, दापोलीजवळच्या अतिशय निरर्गरम्य आंजर्ले गावात. त्यासाठी सुमारे अडीच हजार एकर जमीन संपादीत केली जाणार आहे.

तर याच कंपनीकडून दाभोळ मध्ये 2 हजार मेगावॅट क्षमतेचा आणि 9 हजार कोटी गुंतवणुकीचा दुसरा औष्णीक वीज प्रकल्पही उभारला जाणार आहे.

टीयाना कंपनीच्या अधिकार्‍यांनी आज रत्नागिरीत यासंबंधी घोषणा केली.

उर्जा मंत्रालयाकडून टीयाना कंपनीला या संबंधात लवकरच परवानगी मिळणार असल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close