S M L

सर्जिकल स्ट्राईक बनावट, निरुपम यांचा सरकारवर हल्लाबोल

Sachin Salve | Updated On: Oct 4, 2016 06:59 PM IST

सर्जिकल स्ट्राईक बनावट, निरुपम यांचा सरकारवर हल्लाबोल

04 ऑक्टोबर : भारताने राजकीय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा पसरवली आहे. सर्जिकल स्ट्राईक बनावट आहे असा गंभीर आरोप मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय.

गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने पाकव्यापत भागात घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. या कारवाईत 38 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या सर्जिकल स्ट्राईकवर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय. सर्जिकल स्ट्राईकही बनावट होती. राजकीय फायद्यासाठी भाजपने सर्जिकल स्ट्राईकची अफवा पसरवली आहे. सर्जिकल स्ट्राईकचे सरकारने पुरावे द्यावेत अशी मागणी निरुपम यांनी केलीये. तसंच जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत ही सर्जिकल स्ट्राईक फेक आहे असंही संजय निरूपम म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2016 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close